आळंदी दर्शन

॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र,जिथे नांदतॊ ज्ञानराजा सुपात्र ॥
॥ तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांशी ॥

Language Settings

New:Search Advertisement
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥ जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी । येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

ताज्या घडामोडी

* अलंकापुरीला भेट देणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा ! अलंकापुरीला भेट देणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा !*

आळंदीची भौगोलिक माहिती

धन्य अलंकापूर इंद्रायणी तीर | देव सिध्देश्वर नांदे तेथे |
पुण्यक्षेत्र ऐसे पाहुनीया आधी | घेतली समाधी ज्ञानदेवे ||

आळंदी हे गाव महाराष्ट्र राज्यातील,पुणे जिल्हयातील,खेड तालुक्यात आहे.या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यात आहे. परंतु आळंदी हे गाव आता शहरात रुपांतरीत झाले आहे.

शेजारील नकाशा राज्यातील आळंदीचे ठिकाण दर्शवतो.

आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे.हि नदी मावळ तालुक्यातून येते.पावसाळ्यात हि नदी दुधडीभरून वाहते.नदीवर एक धरण बांधले असून पुढे छोटा बांध आहे.

 हे शहर समुद्रसपाटीपासून अंदाजे ५७७ मी.(१,८९३ फूट) उंचावर आहे.आळंदीतील हवामान हे अति उष्ण किंवा अति थंड नसून मध्यम प्रकारचे आहे.

भौगोलिकदृष्ट्या आळंदी हे शहर अशा ठिकाणी वसलेले आहे जेथे नैसर्गिक आपत्तींचा उद्रेक अभावाने आढळतो.

ALANDI DARSHAN : श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती देणारी पहिली वेबसाईट.जाहिराती साठी ८९८३५२०५५८ या क्रमांकावर whatsapp वर पाठवा.जाहिराती पाहण्यासाठी Search या लिंक वर क्लिक करा.
|| जय जय रामकृष्ण हरी || जय जय रामकृष्ण हरी || जय जय रामकृष्ण हरी || जय जय रामकृष्ण हरी ||
प्रतिक्रिया / तक्रारी / सूचना
Please Contact Us