आळंदी दर्शन

॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र,जिथे नांदतॊ ज्ञानराजा सुपात्र ॥
॥ तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांशी ॥
आजची तारीख : वेळ :
Language Settings

संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा

आषाढ महिन्यामध्ये श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर असे वारीचे मार्गक्रमण असते.श्री गुरु हैबतबाबा यांनी हा सोहळा सुरु केला.श्रींच्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम हा आधी ठरवला जातो.त्यात तिथी,दिनांक,वार,सकाळी निघण्याचे ठिकाण सकाळचा विसावा,दुपारचा नैवेद्य,दुपारचा विसावा व रात्रीचा मुक्काम असे टप्पे असतात.आळंदी मंदिरातून प्रस्थान करून पालखी पंढरपूरकडे जायला निघते.पुणे,सासवड,जेजुरी,वाल्हे,लोणंद,फलटण,नातेपुते,माळशिरस,वेळापूर,वाखरी आणि पंढरपूर असे पालखीचे मार्गक्रमण असते.

पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.

देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी(आषाढी वारी) करण्याला विशेष महत्त्व आहे.

संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा कार्तिकी सोहळा

कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत हा महोत्सव असतो.कार्तिक शुद्ध एकादशीस पंढरपूरला गेलेले वारकरी आपापल्या दिंड्या घेवून कार्तिक वद्य एकादशीस आळंदीस येतात.श्री हैबातरावबाबा व श्री वासकर यांच्या दिंड्या पांडुरंगाला आळंदीच्या उत्सवाचे निमंत्रण देवून कार्तिक वद्य सप्तमीस आळंदीस मुक्कामास येतात तसेच देहूकर,गंगुकाका,शिरोळकर,जळगावकर इत्यादींच्या दिंड्या वद्य अष्टमीला आळंदीत येऊन दाखल होतात.अशाप्रकारे नवमी व दशमीपर्यंत दिंड्यादाखल होतात.बहुतेक दिंडी प्रमुखाला मंदिरात चोपदाराकरवी श्रींचा नारळ प्रसाद म्हणून देण्यात येतो.दशमी ते द्वादशीपर्यंत देवळात अतिशय गर्दी असते.त्रयोदशी ते माउलींच्या समाधीचा दिवस.याप्रसंगी आळंदीला दीड ते दोन लाखापर्यंत यात्रा भरते.

कार्तिक शुद्ध एकादशीस दुपारी १२ ला ,द्वादशीस दुपारी ४ ला व अमावस्येस रात्री ९ ला श्रींची पालखी भजन दिंडीसह नगरप्रदक्षिणेस निघते.एकादशीला ती मारुती मंदिरात विश्रांतीसाठी थोडावेळ थांबते.या सप्ताहात सारी आळंदी भजने,कीर्तने व प्रवचने यांनी भक्ती-आनंद कल्लोळात डुंबत असते.मार्गशीष शुद्ध सप्तमीला सर्व देऊळ धुण्यात येवून प्रक्षाळ पूजा होते व प्रसाद होवून या महोत्सवाची सांगता होते.

श्री क्षेत्र आळंदी यात्रा